ओव्हरहेड वायर तुटल्याने कामठी रेल्वेची वाहतूक विस्कळीत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेगाड्या ठप्प

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 24:-दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मुंबई-हावडा रेल्वे मार्गाच्या कामठी रेल्वे मार्गावरील 1115/30रेल्वे की मी अंतरावरील कामठी रेल्वे स्टेशन ते आजनी रेल्वे फाटक मार्गावरील ओव्हरहेड वायर शॉक सर्किट होऊन तुटल्याचा प्रकार आज सकाळी सात दरम्यान घडली.ज्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेवरील रेल्वेगाड्याची वाहतूक तूर्तास ठप्प झाली असून बराच वेळ होईपर्यंत रेल्वे वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती.
ऐन सकाळीच ओव्हरहेड वायर तुटल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड वायर बांधण्याचे काम हाती घेतले आहे. युद्धपातळीवर हे काम सुरू असून लवकरच दुरुस्तीचे काम करून रेल्वे सेवा पूर्ववत केली जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं. मात्र, कितीवेळेत हे काम पूर्ण होईल हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही.
कामठी रेल्वेस्टेशन हे इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असून दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मुंबई-हावडा मार्गावर वसले असुन या रेल्वे मार्गावरून दैनंदिन शिवनाथ एक्सप्रेस,टाटा इतवारी एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस,इंटरसिटी एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस यासारख्या पॅसेंजर व एक्सप्रेस रेल्वेगाड्या धावतात त्यातून दररोज 5 हजाराच्या आतील प्रवासी रेल्वे प्रवास करतात .मात्र आज ऐन सकाळी विद्दुत दाब वाढल्याने कामठी रेल्वे रुळावरील ओव्हरहेड वायर चा स्पार्क होऊन वायर तुटून पडल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली.ज्यामुळे या मार्गावरून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासींना रेल्वे प्रवासापासून वंचित राहावे लागले तसेच आजनी रेल्वे फाटक बराच वेळ तासनतास बंद असल्याने या मार्गावरून वाहतूक करणारे जड वाहतूक सेवा ठप्प पडली होती.

कित्येक जड वाहने हे आजनी रेल्वे फाटक जवळील नागपूर जबलपूर महामार्गावर उभे असल्याने जड वाहने वाहतूक सेवा ही विस्कळीत झाली होती. मात्र सदर घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिकीय विभागाने दखल घेत ओव्हरहेड वायर जोडनीच्या दुरुस्ती कामाला गती देण्यात आली.बातमी लिहिस्तोवर ओव्हरहेड वायर जोडणी दुरुस्तीकरणाचे काम पूर्णत्वास आले नव्हते हे इथं विशेष !तर या घटनेने रेल्वे प्रवासिसह रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

12 लक्ष रुपयांची सडकी सुपारी जप्त करण्यात एपीआय नरेंद्र तायडे ला यशप्राप्त

Tue May 24 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 24:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या लिहिगाव येथील श्री वाधवाणी कोल्ड स्टोरेज मधून अवैधरित्या विना परवाना सडक्या सुपारीचे 50 पोते वाहून नेत असलेल्या टाटा पिकअप वाहनावर वाहतुक पोलिस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र तायडे व पथकाने गस्त दरम्यान यशस्वीरीत्या धाड घालण्याची कारवाही काल सकाळी 11 दरम्यान केली असून या धाडीतुन टाटापीक वाहनचालक सह 12 लक्ष रुपयांचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!