संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 24:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या लिहिगाव येथील श्री वाधवाणी कोल्ड स्टोरेज मधून अवैधरित्या विना परवाना सडक्या सुपारीचे 50 पोते वाहून नेत असलेल्या टाटा पिकअप वाहनावर वाहतुक पोलिस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र तायडे व पथकाने गस्त दरम्यान यशस्वीरीत्या धाड घालण्याची कारवाही काल सकाळी 11 दरम्यान केली असून या धाडीतुन टाटापीक वाहनचालक सह 12 लक्ष रुपयांचा सडक्या सुपारीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच वाहनचालक जयंत राजू बर्मन वय 27 वर्षे रा डिप्टी सिग्नल कळमना नागपूर ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक पोलीस विभागाचे एपीआय नरेंद्र तायडे हे पोलीस पथकासह गस्तवर असताना नागपूर जबलपूर महामार्गावरील लिहिगाव पारडी मार्गावर शेंदरेच्या ढाब्याजवळ बाराद्वारी कडे जाणाऱ्या रस्त्यावर रॉग साईडने येणारे अशोक लेलॅण्ड पिकअप वाहन क्र एम एच 49 /एटी/7652 ला थांबवून वाहनचालकाची विचारपूस केल्यास वाहनात असलेला सुपारी चा मुद्देमाल हा लिहिगाव येथील श्री वाधवाणी कोल्ड स्टोरेज मधून आणून वाहतूक करीत आहे तर हा मुद्देमाल कुठे पोहोचवायचा आहे, हे माल मालक फोन करून सांगणार आहे सद्या काही माहिती नसल्याचे सांगून पोलिसांना असमाधान कारक उत्तर दिले.पोलिसांनी यासंदर्भात सदर वाहनचालकाला पारडी पोलिसांच्या ताब्यात देऊन पिकअप वाहम जप्त करून वाहनातील प्रत्येक बोरी मध्ये 60 किलो ग्राम ने भरलेले एकूण 50 बोरे असे एकूण 3 हजार किलो ग्राम किमतो 12 लक्ष रुपयांची सडकी सुपारी जप्त करीत नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सुपारी गोडाऊन मध्ये सुद्धा पाहणी करण्यात आली.
ही यशस्वी कारवाही वाहतूक पोलीस उपायुक्त आव्हाड, एपीआय नरेंद्र तायडे,पोलीस शिपाई मंगेश लांजेवार, आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.