– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 25:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी-गादा मार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या हरिणाला एका वाहनाने दिलेल्या धडकेतून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7 दरम्यान विनोद वाठ यांच्या शेताजवळ उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने सदर हरणाचा मृतदेह वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.