स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची कारवाई
नागपुर – पो.स्टे. वेलतुर येथे रिपोर्ट दिली की, दिनांक 06/09/2022 ते दिनांक 07/09/2022 चे सकाळी 07.00 वा. दरम्यान त्यांचे शेतात बैलांना चारा टाकण्यासाठी ते गेले असता त्यांची बैल जोडी कि. 70,000/-रूपये शेतातील झोपडीत बांधले होते. नंतर चारा टाकुन 10.00 वा. दरम्यान ते घरी निघुन गेले.
दि. 07/09/22 रोजी सकाळी 06.00 वा. दरम्यान फिर्यादी शेतात गेले असता त्यांचे शेतातील दोन्ही बैल दिसले नाही. एक खुटा उपटुन नेला असुन दुसÚया खुटयाला दावा बांधलेला दिसला. त्यामुळे फिर्यादीने आजुबाजुचे परिसराची पाहणी केली असता बैल दिसले नाही. ते पोलीस स्टेशन येथे चोरीची तक्रार करणेकरीता आले असता पोलीस स्टेशन मध्ये सिर्सी पुर्नवसन येथील सदाराम संतोष सहारे वय 62 वर्ष यांचे घराजवळील रोड लगत बांधलेली पांढÚया रंगाचे बोटुक शिंगे असलेले 2 बैल किमती अंदाजे 60,000/-रू. त्याच रात्री चोरून नेल्याचे माहीती पडले. फिर्यादी आणि सदाराम संतोेष सहारे यांचा असा एकुण 2 बैलजोडी किमती 1,30,000/-रू. चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने खुल्या जागेतुन रात्री चोरून नेल्याचे फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. वेलतुर ला अप.क्र. 123/2022 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
नमुद गुन्हयाचा तपास सुरू असतांना, दिनांक 07/09/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त माहीतगाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली त्यावरून पथकाने आरोपी क्र. 1. जावेद जाफर शेख, वय 28 वर्ष, रा. बडा ताजबाग, नागपूर व 2. सुमित निरंजन भगत, वय 25 वर्ष, रा. पिली नदी, नागपूर यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता आरोपीतांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांचेवर संशय बळावल्याने अधिक विचारपुस केली असता त्यांनी जनावरे चोरी केल्याचे कबुल केले. त्यांचे ताब्यातुन टाटा विंगर चार चाकी गाडी कि. 8,00,000/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, जानावरे व आरोपीतांना पुढील कायदेशिर कार्यवाही करीता पोस्टे वेलतुर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणिकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि अनिल राऊत, पोहवा विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, अरविंद भगत, नापोशि शैलेश यादव, विरेन्द्र नरड, प्रणय बनाफर चापोना शुकला यांचे पथकाने पार पाडली.