कोदामेंढी :- येथील सावंगी रस्त्यांवरील पथदिवे उन्हाळ्यापासून म्हणजेच मागील पाच महिन्यापासून विद्युत खांबांवर व तारांवर काटेरी झुडपे व झाडे वाढल्याने व त्यांची वेळीच छटाई न केल्याने विद्युत तारा एकमेकांना चिपकून जे पथदिवे लावण्यात आलेले होते ते बंद झाले . सावंगी रस्त्यावरील चार विद्युत खांबांवरील पथदिवे बंद असल्याच्या बातम्यांची मालिका ऑक्टोंबर महिन्यात विविध दैनिक मराठी व दैनिक हिंदी तसेच न्यूज टुडे ट्वेंटी फोर बाय सेवन या ई पोर्टलच्या माध्यमातून सतत प्रकाशित करण्यात आल्या. याची दखल घेत नोव्हेंबर महिना लागतात म्हणजे दिवाळी पंचमीपूर्वी अरोली वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी विद्युत खांबावरील लोम्बकाळणारे काटेरी झुडपे व झाडांची छटाई करून व तार दोरीने आवरून सरळ केले तर लगेच दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत मधील दिवाबत्ती कर्मचारी नथू सोनटक्के यांनी चारही विद्युत खांबांवर पथदिवे लावून उन्हाळ्यापासून अंधकारमय असलेला तो परिसर व सावंगी पुलावरील परिसर दिवाळी पंचमी पूर्वी अखेर प्रकाशमय केला. ‘”ये है कलम की ताकत” असे म्हणत वार्ड नंबर तीन मधील सामाजिक कार्यकर्ते तथा वृत्तपत्राचे व जाहिरातदार एजंट रमेश हटवार यांनी माध्यमांबद्दल गौरोदगार काढले.