गणेश लेआउट रामगड येथे 23 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार, आरोपी तरुणास अटक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– नवीन कामठी पोलिसांची कारवाई 

कामठी ता प्र :- कामठी नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश लेआउट रामगड घोरपड रोड येथे 23 वर्षीय विवाहित महिलेवर आरोपीने दिनांक 21 मार्च ला दुपारी साडेचार वाजता सुमारास घरी कोणी नसल्याचे संधी साधून जबराणीने जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार केला विवाहित महिलेच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपी तरुणास अटक केली नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या कुटुंबासह गणेश लेआउट रामगड घोरपड रोड येथे रहात असून दिनांक 23 मार्चला दुपारी साडेचार वाजता सुमारास त्यांचे ओळखीचा आरोपी शेख अरबाज शेख उस्मान वय 22 राहणार ताजबाग कामठी हा तिचे घरी आला घरी कुटुंबातील कोणीही सदस्य नसल्याने आरोपीने बळजबरीने 23 वर्षीय विवाहित महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार करून पसार झाला अत्याचार ग्रस्त महिलेने सायंकाळी सात वाजता सुमारास आपल्या कुटुंबातील सदस्यासह नवीन कामठी पोलीस स्टेशनला येऊन आरोपी शेख अरबाज शेख उस्मान चे विरोधात अत्याचार केल्याची तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी कलम 376, 450 ,506 भादवी नुसार गुन्हा दाखल करून आरोपी शेख अरबाज शेख उस्मान यास अटक केली वरील कारवाई ठाणेदार भरत क्षीरसागर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर यांनी केली

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com