श्री संत गजानन महाराज पायी पालखी सोहळा २० ला 

कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील श्री गजानन भजन पारायण मंडळ तथा भक्त परिवार तर्फे श्री च्या पायी पालखी सोहळा रविवार दिनांक 20 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे .श्री राधाकृष्ण विठ्ठल रखुमाई सार्वजनिक देवस्थान येथून सकाळी ठीक सहा वाजता आरती व ठीक सात वाजता पालखी प्रस्थान होणार आहे. श्रींच्या पायी पालखी जाण्याच्या मार्ग भांडेवाडी -अरोली- खापरखेडा -पारडी -निमखेडा मार्गे श्री संत गजानन महाराज मंदिर तारसा येथे सायंकाळी चार वाजता पोहोचून महाआरतीनंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे. शेगावची भक्तिगंगा ते तारसा श्री चे मंदिर एकूण अंतर 16 किलोमीटर असून या पालखी सोहळ्याच्या लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'कल उनकी थी दिवाली' काव्यसंग्रहाचे शनिवारी प्रकाशन

Fri Oct 18 , 2024
नागपूर :- सनदी अधिकारी डॉ. अतुल पाटणे लिखीत ‘कल उनकी थी दिवाली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार 19 रोजी दुपारी 2.30 वाजता मधुरम हॉल, फतेचंद मोर हिन्दी भवन, राणी झांसी चौक येथे करण्यात येणार आहे. कार्यक्रमात रेमन मैग्सेसे पुरस्काराने सम्मानित डॉ. मंदाकिनी आमटे, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापड़कर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. प्रकाशनानंतर काही निवडक कवितांचे वाचन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com