नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी ५.२५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले.
विमानतळावर खासदार कृपाल तुमाने, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंघल, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरने चंद्रपूरकडे प्रयाण केले.
चंद्रपुरात श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण व उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. रात्री उशिरा ते नागपूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील.