पत्रकारांच्या वार्षिकोत्सवात गुणवंतांचा सत्कार, मेळावा

नागपूर :- राज्य सरकारचे माहिती आयुक्तालय आणि पत्रकारांच्या संघटना यांच्या संयुक्त वतीने लवकरच पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा नागपूरचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केली आहे.

नागपूर श्रमिक पत्रकार संघ, पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांच्या वार्षिक स्नेहमिलन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.‌ गेल्या वर्षात पुरस्कार-पदे मिळवणारे पत्रकार आणि परीक्षांमध्ये चांगले यश मिळविणारे पत्रकारांचे अपत्य यांचा यावेळी पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‌ देवेश गोंडाणे (लोकसत्ता), महेश उपदेव (सामना), परितोष प्रामाणिक (हितवाद), टिकाराम साहू (भास्कर), राजेश्वर ठाकरे ( लोकसत्ता), सुरभी शिरपूरकर (लोकमत डिजिटल)आदींचा सत्कारमूर्तीत समावेश आहे.

महाराष्ट्र दिनी प्रेस क्लबमध्ये झालेल्या या स्नेहमिलनात राजेश दुरुगकर यांच्या वाद्यवृंदाने उपस्थित पत्रकार कुटुंबीयांना रिझविले. यात राम भाकरे आणि नरेश डोंगरे या पत्रकारांनीही गाणी सादर केली.

पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, सरचिटणीस शिरीष बोरकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष विश्वास इंदूरकर, विश्वस्त विनोद देशमुख, प्रभाकर दुपारे, गणेश शिरोळे, मनीष सोनी यांच्यासह अनेक पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Metro Rail Corporation Limited - Sunday, passenger services will not be available between Gaddigodam and Automotive Metro Stations

Fri May 3 , 2024
*Maharashtra Metro Rail Corporation Limited* (Nagpur Metro Rail Project) Nagpur :- On 05.05.2024 Sunday, passenger services will not be available between Gaddigodam and Automotive Metro Stations for maintenance works. Inconvenience caused to commuters is deeply regretted. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com