विवाहित तरुणाचा झोपेतच अकस्मात मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गौतम नगर ,छावणी येथे एका विवाहित तरुणाचा झोपेतच अकस्मात मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजता निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव आलोक पंजाबराव मेश्राम वय 29 वर्षे रा गौतम नगर कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पिल्ले यांनी सहकारी पोलिसांसह घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतक हा दारू पिण्याच्या सवयाधिन असल्याने कदाचित अती मद्य प्राशनाने मृत्यू झाला असावा असा तर्क लावण्यात येत आहे तर मृत्यूचे खरे कारण मृतकाच्या शवविच्छेदन अहवाला नंतरच स्पष्ट होईल.मृतकाच्या पाठीमागे आई, दोन भाऊ, दोन बहिणी,पत्नी व एक दीड वर्षाचा मुलगा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 'आरटीई'शाळेच्या नोंदणी प्रक्रियेत 41 शाळांचा समावेश

Wed Feb 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – तालुक्यातील 456 विद्यार्थ्यांना 41 शाळेत मिळणार मोफत प्रवेश कामठी :- शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत तालुक्यातील खाजगी शाळांमध्ये व त्याचप्रमाणे कामठी पंचायत समिती अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया झाली.त्यानुसार कामठी तालुक्यातील 41 शाळांमध्ये 456 विद्यार्थ्यांना ‘आरटीई ‘ अंतर्गत प्रवेश मिळणार आहे.लवकरच पालकांना अर्ज करता येणार असल्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com