नागपूर :- जरीपटका पोलीसांना खात्रीशीर माहिती मिळाली की हडपार महिला नामे भारती खरे ही आपले घरी परत आली आहे, अशा माहितीवरून ०८१५ वा. चे दरम्यान हद्दपार महिलेचे घरी जावुन चेक केले असता, तेथे हद्दपार महिला आरोपी नामे भारती सुरेश खरे, वय ३५ वर्ष, रा. इंदिरा नगर, गल्ली नं. ११, जरीपटका, नागपूर ही घरी हजर मिळुन आली. नमुद महिला आरोपीस मा. पोलीस उप आयुक्त परि, क. ५ यांचे आदेश क. ८/२०२४ दिनांक १०.०५.२०२४ पासुन ०६ महिन्याकरीता नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीतुन हद्दपार केल्याचे दिसुन आले. नमुद महिला ही विणा परवाना हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून पोलीस ठाणे हद्दीत मिळून आली.
याप्रकरणी फिर्यादी पोअं. विकास पाठक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे पोउपनि, खुटवड यांनी आरोपी महिले विरूध्द कलम १४२ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.