Ø सर्वेक्षणासाठी यंत्रणा सज्ज
Ø 23 तारखेपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात
नागपूर :- राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी विभागात 29 हजार 42 प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 23 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणासंदर्भात उच्चस्तरीय आढावा घेतला. त्यानुसार दि. 31 जानेवारी पर्यंत सर्वेक्षणाचे काम युध्द पातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे.
विभागातील 64 तालुक्यातील तसेच महानगरपालिका हद्द अशा 8 हजार 429 गावात गावातील 1 कोटी 17 लाख 53 हजार 52 लोकसंख्या, तसेच 26 लाख 93 हजार 433 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी 29,042 प्रगणकांच्या सेवा घेण्यात येणार आहे.त्यासोबतच 223 राखीव प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार 970 पर्यवेक्षक तसेच 188 राखीव पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. 150 प्रगणकाची नियुक्ती करताना 150 ते 200 कुटुंबासाठी एक प्रगणक आणि 15 प्रगणकांसाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला आहे. प्रगणक व परीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राज्य मागासवर्गीय आयोगाचे सर्वेक्षणासाठी लोकसंख्या व घरांच्या संख्येनुसार प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिका हद्दीतील पाच लाख 27 हजार 634 घरांची संख्या असून 24 लाख 5 हजार 656 लोकसंख्येसाठी 7055 प्रगणक नियुक्त करण्यात आले आहे .नागपूर जिल्ह्यातील चार लाख 42 हजार 897 घरातील 22 लाख 14 हजार 485 लोकसंख्या असून त्यासाठी 678 प्रगणक राहणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील तीन लाख 9846 घरातील 13 लाख 674 हजार लोकसंख्या, भंडारा जिल्ह्यातील दोन लाख 78 हजार 76 घरातील बारा लाख 334 लोकसंख्या, गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख 92 हजार 369 घरातील 13 लाखा 22 हजार 507 लोकसंख्या, चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील 69 हजार,869 घरातील तीन लाख 52 हजार 417 लोकसंख्या, चंद्रपूर जिल्ह्यातील चार लाख 70 हजार 982 घरातील 18 लाख 83 हजार 928 लोकसंख्या, तर गडचिरोली जिल्ह्यातील तीन लाख 760 घरातील दहा लाख 72 हजार 942 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.