“समता पंधरवडा”च्या अनुषंगाने विशेष मोहीमेचे आयोजन

– जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत विशेष मोहीम

गडचिरोली :- सामाजिक न्याय विभागाने दिनांक 10 एप्रिल 2023 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये “समता पंधरवडा” अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत असून या संदर्भात माहिती गडचिरोली जिल्हयातील सर्व लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आयोजन करणेबाबत आयुक्त, समाज कल्याण, म.रा.पुणे, व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी निर्देश दिलेले आहे.

समितीस दिनांक 29 मार्च 2024 पर्यंत प्राप्त झालेले जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव निकाली काढण्यात आलेले आहेत. (त्रृटीचे प्रकरणे वगळून) परंतु ज्यांना आजपावेतो जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, असे प्रकरणे त्रृटी मध्ये असून प्रस्तावातील त्रृटी पुर्तता न झाल्याने व जात व अधिवासाचे सक्षम पुरावे सादर न केल्याने असे प्रस्ताव समितीच्या निर्णयार्थ प्रलंबित आहेत. अशा सर्व अर्जदारांकरीता दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी त्रृटींची पुर्तता करण्यासाठी “समता पंधरवडा” च्या अनुषंगाने विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.

तसेच सन 2023-24 मध्ये वर्ग 12 विज्ञान शाखेतील विद्यार्थी MH-CET, JEE, NEET, B.ED CET, M.ED CET, LLB CED, B.SC AGRI CET, व MBA CET या सारख्या इतर प्रवेश पात्रता परीक्षा अंतर्गत व्यावसायीक पाठयक्रमास प्रवेश घेत असल्यास भरण्यात आलेल्या अर्जाची प्रतीसह तसेच सर्व पुराव्यांच्या मुळ व छायाकिंत प्रतीसह जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विद्यार्थ्यांनी विहीत नमून्यात (Online) अर्ज आवश्यक दस्ताऐवजासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणूक 2024 - गडचिरोली जिल्ह्यासाठी 2613 शाईच्या बाटल्या

Sat Apr 13 , 2024
• महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याकरिता 2613 बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. तर महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघाकरिता सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आरमोरी , गडचिरोली आणि अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 950 मतदान केंद्र आहेत. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!