भाजीमंडीत क्राईम ब्रांचची धाड ,63गोवंश जनावरांना पोलिसांनी दिले जीवनदान 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- जुनी कामठी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाजीमंडीत नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच)च्या पथकाने दोन ठिकाणी धाड घालण्याची यशस्वी कारवाही मध्यरात्री दीड ते अडीच दरम्यान केली असून या धाडीतून 63 गोवंश जनावरे जप्त करण्यात आले.तर यातील पाहिजे आरोपी मो इसरार अब्दुल जब्बार वय 46 वर्षे व अनिस अहमद कुरेशी वय 46 वर्षे दोन्ही राहणार भाजी मंडी कामठी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून 2 लक्ष 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्र 5 च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील भाजी मंडीतील नमूद पाहिजे आरोपीच्या घरी धाड घालून निर्दयतेने बांधून ठेवलेले गोवंश जनावरे ताब्यात घेऊन जप्त जनावरे नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून गोवंश जनावरांना जीवनदान दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ACCIDENT OF INDIAN AIR FORCE MIG-21 AIRCRAFT

Mon May 8 , 2023
New Delhi :- A MiG-21 fighter aircraft of the Indian Air Force (IAF) crashed today morning at about 0945 hours. The aircraft had got airborne for a routine operational training sortie from the Air Force Station at Suratgarh. Soon thereafter, the pilot experienced an onboard emergency, following which he attempted to recover the aircraft as per existing procedures. Having failed […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com