यवतमाळ :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, यवतमाळ येथे दि.१४ मार्च रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्याला पालकमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.
मेळाव्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांचे मनोगत देखील होणार आहे. या मेळाव्याकरिता सामाजिक न्याय भवन येथे जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक संचालक मंगला मून यांनी केले आहे