कन्हान पोस्टे ला वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस चार कि मी अंतरावर असलेल्या गहुहिवरा ते खोपडी रोड वर एका बोलेरो पिकअप वाहनाने प्रज्वल ज्ञानेश्वर लुहरे याचा मित्रा अनिकेत रामुजी दोडके च्या साईकल ला समोरू न जोरदार धडक मारून झालेल्या अपघातात अनिके त दोडके गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीस स्टेश न ला अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करू न पुढील करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.२) मे २०२२ ला सकाळी ५ ते ५:३० वाजता दरम्यान प्रज्वल ज्ञानेश्वर लुहुरे वय २० वर्ष राह. गहुहिवरा कन्हान व त्याचा मित्र अनिकेत रामुजी दोडके हे दोघे ही सायकलने अपोलो करीयर अकडमी नगरधन ट्रेनिंग सेंटर येथे जात अस तांना समोरून येणारी पांढऱ्या रंगाची बोलोरो पिकअ प अवैद्य जनावराची वाहतुक करणा-या वाहन चालका ने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्का ळजी पणाने चालवुन अनिकेत दोडके याच्या सायकल ला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात अनिकेत दोडके गंभीर जख्मी झाल्याने त्याचा उपचार न्युराॅन रुग्णालय नागपुर येथे सुरू आहे. फिर्यादी प्रज्वल ज्ञानेश्वर लुहरे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात पिकअप वाहन चालका विरुद्ध अप क्र २५५/२०२२ कलम २७९ , ३३७ , ३३८ भादंंवि सह कलम १८४ , १३४ ( अ) ( ब) वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गद र्शनात कन्हान पोलीस करीत असुन बोलोरो पिकअप वाहन व चालक आरोपीचा कन्हान पोलीस शोध घेत आहे .