संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी जमैतुल कुरैश संघटन तसेच आदी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने काल 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात आले.यावेळी गोपाल शर्मा,ऍड. पंकज यादव, एडवोकेट राजू सरदार, हरीश दवानी, माजी नगरसेवक आरिफ कुरैशी, फारूक अहमद कुरेशी, इरशाद अहमद कुरैशी ,जुबेर कुरैशी ,शोएब कुरैशी, नूर कुरेशी,अरबाज कुरेशी,वकार कुरेशी आदी उपस्थित होते.