पोलीस कुटुंबीयांनी अनाथलयातील मुलांसोबत साजरी केली दिवाळी.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 25 :- कोरोना महामारीच्या संकटातून सावरून घराघरात दिवाळीचा सण साजरा करण्यात आला मात्र नवीन कामठी पोलीस स्टेशन ला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे व त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र सामाजिक बांधिलकी जपत कामठी येथील अनाथलयातील मुलांसोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविला.

कामठी रेल्वे स्टेशन समोरील सर कस्तुरचंद डागा बाल सदन अनाथालय कामठी येथील मुलांना पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे व त्यांच्या कुटुंबीयांनी दिवाळीचे फराळासह फटाके वितरण केले यावेळी संस्थेकडून पोलीस कुटुंबियांचे आभार मानण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Tue Oct 25 , 2022
भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी गडचिरोली, दि. 25 ऑक्टोबर : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights