![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील बाजीराव भोजनालय येथे काल उशिरा रात्री पर्यंत काही दारुडे अवैधरित्या दारू पिऊन जेवण करीत असता पोलिसांनी वेळीच धाड घालून चार आरोपीना ताब्यात घेत त्याविरुद्ध भादवी कलम 68,84 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची कारवाही गतरात्री साडे अकरा दरम्यान केली.
गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपी मध्ये अंकित सुरेश सुखदेवें वय 35 वर्षे रा गवळीपूरा ,प्रतीक अविनाश शेंडे वय 22 वर्षे रा न्यू येरखेडा, अंकित सुरेंद्र पाटील वय 28 वर्षे रा जय भीम चौक ,हार्दिक विजय जैस्वाल वय 27 वर्षे रा मेन रोड कामठी चा समावेश आहे.