दुचाकी अपघातात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यु..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 25:- धुळीवंदन साजरा करण्याच्या उत्साहात आई वडील व भावासह दुचाकीने आजीच्या घरी जात असलेल्या पाच वर्षीय बालिकेचा दुचाकी अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली असून मृतक बालिकेचे नाव आलीशा राजेश दहाट वय 5 वर्षे रा नया गोदाम कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक बालिकेचे वडील राजेश दहाट हे धुलिवंदन उत्साह साजरा करण्यासाठी दुचाकीने कामठी-कन्हान मार्गे सासुरवाडी गाव असलेल्या देवलापार ला जात असता जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कमसरी बाजार जवळ झालेल्या दुचाकी अपघातात मृतक बालिकेचे आई वडील व भाऊ किरकोळ जख्मि झाले तर मृतक बालिका ही जागीच मरण पावले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत घटनेची नोंद केली तर मृतक बालिकेचे आई वडील व भाऊ किरकोळ जख्मि असून नागपूर च्या मेयो इस्पितळात उपचार घेत आहे.पोलिसांनी तुर्तास घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

इको फ्रेंडली वातावरणात होळी पर्व उत्साहाने साजरा

Tue Mar 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – होळी चा रंग उधळला मात्र जरा जपूनच कामठी :- होळीचा दुसरा दिवस हा पाडव्याचा असून होळीच्या या पाडव्याला सकाळपासूनच गुलाल व रंगाची मोठ्या प्रमाणात उधळण होताना दिसली तर बालक मंडळी रंगाच्या रंगात चांगलेच रंगून होते . तर तळीरामासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाचा व धुमाकूळ चा असल्याने कित्येकच कोंबड्या बकऱ्याची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली तर काहींना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights