बाल हक्कांच्या कायद्यांच्या अंमबजावणीतील अडचणी दूर केल्या जातील – ॲड. सुशिबेन शाह

– पोक्सो व बाल अधिनियम कायद्याअंतर्गत नागपूर विभागातील जिल्ह्यांचा आढावा व प्रलंबित प्रकरणांच्या सुनावण्या 

नागपूर :- पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना योग्य प्रशिक्षण देऊन बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांनी सांगितले.

बालहक्क संरक्षण आयोगाने पॉक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर शहर व ग्रामीण, वर्धा गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी नागपूर येथे बैठकीचे आयोजन आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.या बैठकीत बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण, ॲड. जयश्री पालवे, सायली पालखेडकर, चैतन्य पुरंदरे, बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, जिल्हा महिला व बाल संरक्षण विभाग अधिकारी उपस्थित होते.

बैठकीची सुरुवात दीपप्रज्वलन व महाराष्ट्र गीताने झाली. बैठकीच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी अंजली निंबाळकर यांचे अभिनंदन केले.

पोलीस विभाग आणि बालकल्याण समिती यांच्याकडून पोक्सो बाल न्याय अधिनियम संदर्भात प्राप्त माहितीचे विश्लेषण ॲड. संजय सेंगर व मजलिस संस्थेच्या मल्लिका वर्मा यांनी केले. तसेच नागपूर विभागाच्या प्रलंबित प्रकरणांची सुनावणी आयोजित करण्यात आली. यावेळी 25 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी तपासणी शिबीर

Thu Feb 8 , 2024
नागपूर :- सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर व सिकलसेल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नुकतेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी तपासणी शिबीराचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे करण्यात आले. या शिबिरासाठी सिकलसेल असोसिएशनच्या डॉक्टर अनुराधा श्रीखंडे यांनी टेक्निकल एक्सपोर्ट म्हणून या शिबिराची जबाबदारी पार पाडली. शिबिरामध्ये डॉ.अतिष बकाने यांनी हायड्रोकॅसियुरीया औषधीसाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com