वारेगावचा राख बंधारा खचल्याने शेतात शिरले राख – मिश्रीत पाणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– लवकरात पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांची मागणी

कामठी :- खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून निघणारी राख साठवण्यासाठी बांधण्यात आलेला कामठी तालुक्यातील वारेगाव येथील बंधारा काल सायंकाळी 5 दरम्यान खचल्याने केंद्रातील राख नदीच्या पाण्यातून वारेगावच्या शेतात व गावात गेल्याने या राखमीश्रित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे चांगलेच नुकसान झाले.

तेव्हा या घटनेवर माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याप्रति चिंता व्यक्त करीत शासनाने सदर घटनेचा लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई मिळवून द्या उल्लेखणीय आहे की मागील जुलै 2022 मध्ये कोराडी औष्णिक विद्दूत केंद्राचा राखमिश्रित पाण्याचा बंधारा फुटल्याने गावकऱ्यांसह शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाई मिळालेली नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तेव्हा या प्रकरणाची झालेले पंचनामे व वितरित नुकसानभरपाई याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा सुरेश भोयर यांनी केली आहे वारेगाव वासी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई न दिल्यास प्रशासन विरोधात आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

वारेगाव चा बंधारा फुटल्याची माहिती मिळताच तहसीलदार अक्षय पोयाम यांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थितीचे राखमीश्रित जलमय झालेल्या परिस्थितिचे निरीक्षण करून ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित महाजेनकोला विश्वासात घेऊन ही पुरमय स्थिती नियंत्रणात आणण्यात यश गाठले ज्यामुळे शेतपिकाचे होणारे अतोनात नुकसान परिस्थिती नियंत्रणात आली. हा बंधारा २५८ एकरवर असून २.४ कोटी टन इतकी राख साठवली आहे. पण, तिथे साठवलेली राख इतरत्र हलवून बंधारा रिकामा केला जात असल्याचे सांगण्यात आले.मागील २४ तासांत नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने वारेगाव राख बंधाऱ्यात पाण्याचा स्तर अचानक वाढला आणि खापरखेडा कामठी महामार्गाच्या दिशेने नजीकच्या शेतात राख मिश्रित पाणी गेले. घटनेची माहिती कळताच तहसीलदार अक्षय पोयाम व पथक यांनी युद्धस्तरीय प्रयत्न करून पाण्याचा प्रवाह थांबविण्याच्या उपाययोजना केल्या आणि कन्हान नदी प्रदूषित होऊ नये याकरिता हायवे ब्रिज अगोदर व नंतर सुमारे तीन ते चार ठिकाणी फिल्टर्स लावून शर्थीचे प्रयत्न केले असे सांगण्यात आले.

– यापूर्वी जुलै २०२२ मध्ये कोराडी औष्णिक वीज केंद्राची राख साठवण्याकरीता बांधलेला खसाळा बंधारा फुटल्याने राख शेतात व गावात गेली होती. खसाळा राख बंधारा ३१४ एकरवर आहे. नांदगाव आणि वारेगाव येथील अॅश पॉण्ड कायमस्वरुपी बंद करण्यात येऊन त्या जागा वेगाने पूर्ववत केल्या जातील असे आश्वासन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या भेटीत स्थानिकांना दिले होते. मात्र हे बंधारे बंद करण्यात आले नाही हे इथं विशेष!

– हुकूमचंद आमधरे ,शेतकरी नेता व संचालक ,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

– कामठी तालुक्यातील “वारेगाव” येथिल-राखेचा बन्धारा “फूट्ल्यामूले ५० एकर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. यामूळे या भागातील शेतकरी व गावकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माणझाले आहे/ खापरखेडा अंतर्गत टेक्निकल इंजिनियर मार्फ़त हा बन्धारा बांधलेला असून या आधी देखिल फुटलेला आहे.या भागात अजूनही पाऊस कमीच पडलेला असुन “बंधारा “ फूटतो याला कोण ज़बाबदार आहे याची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी . तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बंधुना १०० टक्के नुकसानभरपाई ७ दिवसाच्या आत द्यावी अन्यथा तीव्र “आंदोलन “ करन्यात येईल

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Citizens suffer sans civic grievances redressal mobile app

Thu Jul 20 , 2023
– Decision on new app launch on Friday Nagpur :- In absence of elected representatives and a proper user friendly system of grievance redressal, citizens are unable to draw Nagpur Municipal Corporation’s (NMC’s) attention for resolving their issues. The NMC had launched a user-friendly mobile app but shut it down without any announcement. The ‘Nagpur Live City’ app appears to […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com