राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

नागपूर :- राष्ट्र्र्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत २ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.

कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत.

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे स्वागतपर प्रास्ताविक होईल. लोकप्रतिनिधी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि विद्यार्थी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाले असून हे वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या हिवाळी २०२२ व उन्हाळी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या विविध विद्याशाखेतील परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. परीक्षेमध्ये स्पृहणिह यशबद्दल विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतून डि.एससी. पदवी प्राप्त करणारे डॉ. रामचंद्र हरीसा तुपकरी आणि डॉ. टि. व्ही. गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतीदास रामटेके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. या दीक्षांत समारंभात विद्या शाखा निहाय १२९ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानीत करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईत नऊ जानेवारीला शाश्वत पर्यावरण विकास परिषद - कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

Sat Dec 2 , 2023
मुंबई :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत दि. 9 जानेवारी, 2024 रोजी “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com