शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल
नागपूर :- फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. संकेतस्थळ खालील प्रमाणे आहेत.
1) mahresult.nic.in
2) https://hsc.mahresults.org.in
3) http://hscresult.mkcl.org
4) https://hindi.news18.com/news/career/board-result-maharashtra-board
5) https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
6) http://mh12.abpmajha.com
यासोबतच mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. गुण पडताळाणीसाठी दिनांक 26 मे, 2023 ते 5 जुन 2023 पर्यंत व छायाप्रतीसाठी 26 मे, 2023 ते 14 जुन 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल, अशी माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या सहसचिवांनी पत्रकाद्वारे दिली आहे.