नागपूर शहरातील विकासकामांना गती द्या – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला निर्देश

नागपूर :- शहरात नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या वतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) प्रशासनाला दिले.

ना. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत भाजी व मटण मार्केट, गोकूळपेठ बाजारपेठेचे आर्किटेक्चर डिझाईन, नेताजी मार्केट, फुल मार्केट, कॉटन मार्केट, यशवंत स्टेडियम, क्रेझी कॅसल, डिक दवाखाना, क्रीडांगणे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक आदी विषयांवर चर्चा झाली. महाल येथील बुधवार बाजाराचा आढावा घेताना ना. गडकरी यांनी कायदेशीर कार्यवाही वेगाने करण्याची सूचना दिली. बाजारातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या सोयीने याठिकाणी उत्तम असे मार्केट उभे करण्याचे काम तातडीने होण्याची गरज आहे. ज्या लोकांची उपजीविका भाजी व मटण मार्केटवर अवलंबून आहे, त्यांच्या सर्व सोयीसुविधांचा विचार करून हे काम करावे, असे ना. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यासोबतच गांधीबाग येथील सोख्ता भवन, दही बाजार, पोहा ओळी येथील नियोजनाचा आढावाही त्यांनी घेतला. आरेंज सिटी स्ट्रीटवरील महानगरपालिकेच्या अख्त्यारीत असलेल्या जागांच्या वापराबाबत काय नियोजन आहे आणि किती दिवसांमध्ये ते पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे, याचीही माहिती सादर करण्यास मंत्री महोदयांनी सांगितले. भूपसंपादन प्रकरणातील मोबदला वितरणही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले.

क्रीडांगणे तातडीने सज्ज करा

नागपूर शहरातील मुले मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून मैदानावर खेळली पाहिजेत. त्यासाठी शहरातील मैदाने, त्यावर विविध खेळांचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक या सर्व बाबी सज्ज असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शहरातील क्रीडांगणांचा आढावा घेऊन तातडीने सज्ज करण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी नागपूर सुधार प्रन्यासला दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुनर्विकासीत होणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन ला विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलची प्रतिकृती द्या

Mon Aug 21 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पदीसर सौंदरीकरण समिती कामठी चे रेल्वे स्टेशन प्रबंधकला सामूहिक निवेदन कामठी :- अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत कामठी रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला ही कामठी शहरवासीयासाठी मोठी आनंदाची बातमी असून कोटी रुपयाच्या निधीतून कामठी रेल्वे स्टेशनचा विकासात्मक कायापालट होणार आहे.नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात असलेल्या विश्वविख्यात ड्रॅगन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!