संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या विशेष दिवस कार्यक्रम समिती व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती चैत्र शुक्ल अशोकाष्टमी,ला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना सम्राट अशोक यांच्या कल्याणकारी राज्याचा उल्लेख केला व सम्राट अशोकाच्या सार्वभौम धर्म म्हणजेच निष्ठा, आदर, सदाचार आणि समता या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रम अध्यक्ष डॉ. विनय चव्हाण यांनी सम्राट अशोकाच्या जीवनात कलिंग युद्धामुळे झालेले परिवर्तन आणि त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्यांवर प्रकाश टाकतांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे आव्हान केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवती, उपप्राचार्य डॉ.रेणू तिवारी, डॉ.जयंत रामटेके, डॉ.इंद्रजित बसू विशेष दिवस कार्यक्रम समिती सदस्य डॉ.अजहर अबरार, डॉ.महेश जोगी, डॉ.विकास डॉ. कामडी, डॉ.समृद्धी टापरे, डॉ.आशिष थूल यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शालिनी सरोज यांनी केले तर आभार श्रेया मेश्राम यांनी मानले.