‘आरसीएफ’ने भरतीप्रक्रियेसंदर्भात न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- ‘आरसीएफ’ कंपनीने भरतीप्रक्रिया राबवताना न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथील दालनात थळ येथील ‘आरसीएफ’ कंपनीच्या विस्तार प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, ‘आरसीएफ’ कंपनीचे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’आरसीएफ’ कंपनीने भरतीप्रक्रियेसंदर्भात स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल याची प्राधान्याने दक्षता घ्यावी. विस्तारीकरण करताना स्थानिकांबाबत सौहार्दाची भूमिका घ्यावी असे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाकडून यासंदर्भात मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याचे ‘आरसीएफ’ च्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. त्यावर हे मार्गदर्शन येईपर्यंत भरतीप्रक्रिया स्थगित ठेवावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत व आमदार महेंद्र दळवी यांनीही स्थानिकांना प्राधान्य देण्यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिलखुलास' कार्यक्रमात वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांची मुलाखत

Fri Jul 21 , 2023
मुंबई :- रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी शासन सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करत वाहन चालवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांनी केले आहे. रस्ता सुरक्षा ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com