संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– तीन चोरट्याना अटक,2 लक्ष 61 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लोधिपुरा येरखेडा येथून एका कुलूपबंद घरातून 2 जून ते 5जुलै दरम्यान अज्ञात चोरट्याने 2 लक्ष 61 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असता यासंदर्भात फिर्यादी मनीषा कंगाले वय 36 वर्षे रा येरखेडा ने स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 454,457, 380 अनव्ये गुन्हा दाखल करून तपासाला गती देत सिसीटीव्ही फुटेज तसेच डी बी स्कॉड चे वेदप्रकाश यादव यांच्या गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमी वरून पोलिसांनी अवघ्या चार दिवसात आरोपींचा शोध लावण्यात यश गाठले व चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेला एकूण 51 ग्राम सोने व 454 ग्राम चांदीची लगडी असा एकूण 2 लक्ष 61 हजार 180 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपी मध्ये अश्फाक युसूफ खान वय 37 वर्षे ,शेख जाफर शेख मुजफ्फर वय 40 वर्षे,जावेद अन्सारी जलील अन्सारी वय 47 वर्षे तिन्ही राहणार कामगार नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी ह्या आपल्या परिवारासह 2 जुन ला अमरावती येथे गेले असता घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यानी सदर कुलूपबंद घराच्या मुख्य दाराचे कडी कोंड्याला लागलेले कुलूप तोडून घराचे आत अवैधरित्या प्रवेश करून घरातील खोलीत ठेवलेल्या लोखंडी कपाटाच्या लॉकर मधून 51 ग्राम सोने व 454 ग्राम चांदीची लगडी असा एकूण 2 लक्ष 61 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गावाहून परत आले असता 5 जुलै ला घडली. पोलीस स्टेशन ला असलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कामठी शहरात लागलेले सी ओ सी व खाजगी कॅमेऱ्याचे फुटेज पाहून तसेच डी बी स्कॉड चे वेदप्रकाश यादव यांच्या गुप्त बातमी दाराने दिलेल्या गुप्त माहिती वरून सदर आरोपीस अटक करून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त,एसीपी संतोष खांडेकर,वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे, डी बी स्कॉड चे वेदप्रकाश यादव,सुधीर कनोजिया,आशिष भुरकुंडे,श्याम गोरले,राहुल वाघमारे,दीप्ती मोटघरे,सुजाता कुर्वे यांनी केली.