शिवाजी महाराज जयंती महोत्सव कन्हान ला थाटात संपन्न

सेवा संघ कन्हानव्दारे क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-याचा सत्कार करण्यात आला. 

कन्हान : – मराठा सेवा संघ कन्हानव्दारे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य शिवाजी स्मारकास स्टीलची निशानी लावुन लोकार्पण करित क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त ५० विद्यार्थ्यांचा व इतर क्षेत्रातील १० मान्यवरांचा सत्कार करून राजे शिवराय जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव रविवार (दि.१९) फेब्रुवारी २०२३ ला मराठा सेवा संघ कन्हान व्दारे सकाळी ८.३० वाजता संत तुकाराम महाराज मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. शिव मिरवणुक तुकाराम नगर, शहीद चौक, तारसा रोड चौक, आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व जयघोष करित शिव मिरवणुक शिवाजी नगर कन्हान येथे पोहचुन सकाळी ९.३० वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व अभिवादन करून ” आम्हचे तुम्हचे नाते काय ? जय जिजाऊ, जय शिवराय”, ” राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ” चा जयघोष करित मराठा सेवा संघ कन्हान तर्फे स्मारकास बनविलेल्या नविन स्टीलच्या निशानी चे लोकार्पण करून कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल कमलेश भोयर व राजु बंड, सर्पमित्र शेखर बोरकर, कुणाल देऊळकर, सतिश लंगडे, क्रिडा क्षेत्रात खासदार क्रीडा महोत्सव व शालेय क्रिडा अष्टेडू स्पर्धेत प्राविण्य विद्यार्थ्यी प्राची टाकरखेडे (सुवर्ण), अमोल कांबळे (सुवर्ण), श्रेया हूड (रजत), अनिकेत निमजे (रजत), निकिता बेले (कास्य), आदेश आंबागडे (कास्य), पूर्वेश नाईक (कास्य), मोनाली आकरे (कास्य), सोनम गुरुदे (कास्य) सर्व रा. टेकाडी, उशु मिक्स मार्शल आर्ट मध्ये डुमरी स्टेशन चे चुमुकले शिवांश राकेश यादव (सुवर्ण), शिवांशी प्रदीप यादव (सुवर्ण) आणि बीकेसीपी स्कुल कन्हान चे गोकुल ठाकरे, उत्कर्ष रहाटे, जयेश खंडार, आयुष दहीफळकर, अथांग माटे, तनिश मानकर, अंश यादव, हर्षिका सिरिया, रियांशु वानखेडे, तनिशा चौधरी, तनुक्षी् हेटे, खुशी तांडेकर, सानिध्य बावने, मंजिरी गडे, राजश्री मानकर, पि्यांशी पाल, बुलबुल खरवार, रितीका यादव आदी ५० विद्यार्थ्यी व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या १० मान्यवर असे एकुण ६० सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा माया इंगोले, लता जळते, सुनिता ईखार, सुनंदा दिवटे, गिता  घोडमारे, सुनिता मानकर, शांताराम जळते, ताराचंद निंबाळकर, भरत साळवे, यशवंत लांजेवार, मोतीराम रहाटे, प्रशांत भोयर, जिवन मुंगले, राजेंद्र शेंदरे, राकेश घोडमारे, अमोल डेंगे, प्रमोद वानखेडे, प्रविण गोडे, अमोल देऊळकर, कमलसिह यादव, शिवशंकर वाकुडकर, महेश काकडे, स्वप्निल मते, योगराज अवसरे, अशोक राऊत, दिलीप राईकवार, रजनिश मेश्राम, चेतन जयपुरकर, रोशन फुलझेले, सोनु मसराम, हरिश तिडके, रविश सोलंकी, घनश्याम भोंगाडे, नरेंद्र पांडे सह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड शाखा कन्हानच्या पदाधिकारी व सदस्यानी सहकार्य केले. राजे छत्रपती शिवराय जयंती महोत्सव कार्यक्रमास बहु संख्येने शिवप्रेमीनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com