‘जी-२०’ शिक्षण कार्यगट प्रतिनिधींचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग

पुणे :- ‘जी- २०’ परिषदेंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी उपस्थित होते.

जी 20 शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी यावेळी आयोजित योगवर्गात सहभाग घेतला. प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, शिथिल दंडासन, भद्रासन, वज्रासन, उत्तान मंडुकासन, भुजंगासन, शलभासन, पवनमुक्तासन, सेतूबंधासन आदी विविध प्रकारची आसने यावेळी करण्यात आली.

कुलगुरू प्रा.गोसावी यांनी प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत केले. योगगुरू डॉ.संप्रसाद विनोद आणि डॉ.विश्वनाथ पिसे यांनी उपस्थितांना योगासनाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी युवकांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. जी 20 शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी ही प्रात्यक्षिके आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेण्यासोबत योगशास्त्राची माहिती अत्यंत लक्षपूर्वक जाणून घेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाज्योतीच्या एमपीएससी अर्थसहाय्य योजनेतील 131 विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेची संधी

Thu Jun 22 , 2023
नागपूर :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल 28 फेब्रुवारी रोजी जाहीर करणात आला. त्यात महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या 131 विद्यार्थ्यांना विविध विभागात प्रशासकीय काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यातील 68 विद्यार्थी हे इतर मागास वर्ग, 11 विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती –ब वर्गातील 11 विद्यार्थी, भटक्या जमाती –क मधील 18 तर भटक्या जमाती –ड मधील 20 विद्यार्थ्यांचा तसेच विशेष मागास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!