संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी नगर परिषद निवडणुका व तापलेले राजकीय वातावरण लक्षात घेता कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात अनधिकृतपणे झळकणाऱ्या होर्डिंग्ज चा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.या होर्डिंगबहादूरावर स्थानिक नगर परिषद प्रशासन तसेच संबंधित पोलीस प्रशासनाचे कुठलेच नियंत्रण नसल्याने नागरीकामध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून या अनधिकृत होर्डिंग्ज बहादूरकडून स्थानिक नगर परिषद प्रशासनाला मिळकत मिळणाऱ्या आमदनिवर डल्ला मारण्याचे कृत्य बिनधास्तपणे होत असल्याने यासंदर्भात स्थानीक नगर परिषद प्रशासनाचा अभयपणा दिसून येतो.
कामठी नगर परिषद मध्ये गोलछा एडवरटायझिंग,कीर्ती पब्लिसिटी, वरून पब्लिसिटी, रॉयल एडवरटायजमेंट,ग्रेस अँड स्पेस प्रा ली,न्यू नंदा पब्लिसिटी,अराध्या ऍडस, व्यंकटेश ऍडस, अनिल एडवरटायजमेंट,गोलछा ऍडस,अजय कदम,विजय पंडा ,श्री टॉकीज,कृष्ण सुदामा टॉकीज,गोयल टॉकीज कामठी अशा 15 च्या जवळपास अधिकृत होर्डिंगबाज ची नोंद नगर परिषद ला असली तरी शहरात नेहमीच मोठ्या संख्येत जवळपास 100 च्या वर ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग उभारत नगर परिषद प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत आहेत तरीही नगर परिषद यंत्रणेकडून साफ दुर्लक्ष केले जात असल्याने अतिक्रमण विभागाचा कारभार व कर्मचाऱ्या विषयी संशय व्यक्त केल्या जात आहे.या होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण वाढत आहे.शहरात दररोज लहान मोठे असंख्य होर्डिंग्ज झळकत असतात.
कायदेशीर कारवाहिकडे अक्षम्य दुर्लक्ष
-शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आल्या आहेत. वास्तविकता अधिकृत असलेल्या होर्डिंग्जवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून मिळालेले स्टिकर लावायला पाहिजे परंतु शहरातील बहुसंख्य होर्डिंग्जवर अशा प्रकारचे स्टिकर नाही.तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकानासह मुख्य रस्त्यांच्या व्यतिरिक्त शेजारच्या उंच इमारतीवर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आलेले असल्याचे चित्र आहे.नगर परिषदेकडून अशा कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत होर्डिंग्जवर अतिक्रमन निर्मूलन विभागाकडून कायदेशीर करण्यात येत नाहो हे इथं विशेष!
@ फाईल फोटो