– पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांचे हस्ते झाला सत्कार
रामटेक – सर्वस्तरिय कलाकार संस्था तुमसर, भारतीय कलाकार शाहीर मंडळ कामठी, करंट झाटीपट्टी कलाकार संस्था रेंगेपार (कोठा) लाखनी यांच्या संयुक्त विद्यमानाने विदर्भ स्तरिय सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील शाहीर प्रदीप कडबे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
विदर्भ स्तरिय दोन दिवसीय सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दि.११ व १२ फेब्रुवारी रोज शनिवार व रविवार ला मौजा तुडका ग्रा.पं. पटांगणात, ता.तुमसर, जि.भंडारा येथे करण्यात आले होते. शनिवार, (दि.११) फेब्रुवारी ला सकाळी १० वा. उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमादरम्यान रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील रहीवाशी असलेले शाहीर प्रदीप कडबे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर गित सादर केले. तेव्हा त्यांचा याबाबद पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने कामठीचे शाहीर राजेंद्र बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.