फसवणुक करणाच्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- दिनांक. १८.०४.२०२३ चे १४.३० वा. ते दि. २७.०४.२०२३ चे १४.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे प्रतापनगर प्लॉट नं. १४८/ ए, आनंद अपार्टमेंट, पांडे ले आउट, खामला येथे राहणारे फिर्यादी विक्रांत दिलीप निनावे वय २९ वर्ष हे घरी हजर असता त्यांना आरोपी मोबाईल क्र. ८९६५०५८५५० ची धारक प्रिती नावाची महिला हिने फिर्यादीचे मोबाईल वर व्हाटसअप कॉल करून तिचे नाव ए.आर. प्रिती आहे असे सांगुन फिर्यादीचे मोबाईलवर लिंक पाठवून कंपनी बाबत माहिती करून घ्या असे सांगीतले. फिर्यादीने लिंक ओपन केली असता फिर्यादीचे बँकेचे खात्यातून वेळोवेळी एकूण ६,१६,०००/- रु आरोपीने ऑनलाईन डेबीट करून घेतले. आरोपीने फिर्यादीनी ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून व अर्ज चौकशी करून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे पोउपनी कुलसुगे यांनी आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२०, भा.दं.वि. सहकलम ६६(८), माहीती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com