शेकडो पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लॉस्टिकचे राष्ट्रध्वजाचा जमा
नागपूर :- कामयाब फाऊंडेशनद्वारा आयोजित आणि “नाग स्वराज फाऊंडेशन” व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान उत्साहात पार पडले.
कामयाब फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारा वर्षा 2010पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनाद्वारे कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलण्याचे कार्य संस्था करीत आहे. नागपूर शहरातील उद्याने, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले,जीर्ण झालेल्या कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलते.
26 जानेवारी व 15 ऑगष्ट या दिवशी लहान मुले, युवक-युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ घेवून फिरतात व जीर्ण,फाटलेले,कुजलेले (तिरंगा)ध्वज कुठेही फेकून देतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होवू नये म्हणून कामयाब फाऊंडेशनचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीने 26 व 27 जानेवारी 2023 या दिवशी 50 च्या वर कागदी ,प्लॉस्टिकचे आणि कापडी राष्ट्रीय ध्वज जमा केले.
दि.23 ते 27 जानेवारी 2023 या कालावधीत जनजागृती अभियान झाले. या अभियानाच्या दरम्यान शाळा, महाविदयालयातील विद्यर्थीना स्टीकर, पोस्टर वितरण करुन तिरंगाची माहिती व नियमाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आले.
या अभियाना मध्ये कामयाब फाऊंडेशनचे अध्यक्ष हितेश डोर्लीकर, सुशिल यादव, दीक्षिता भिसीकर, गजेंद्र बन्सोड, लक्ष्मिकांत माटे, प्रणय भोगे, हर्षा डोर्लीकर, प्रतीक्षा खोटपाल, यज्ञेश कपले, हेमंत पराते या युवा कार्यकर्तेनि अथक परिश्रम घेतले.