लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ निर्माण करूया – आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे नागरिकांना आवाहन

टाऊन हॉल येथे स्वच्छ भारत अभियान नागपूरचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर यांचा सत्कार

नागपूर :-  नागपूर महानगरपालिका स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी सर्वानी एकत्रित येण्याची गरज आहे. नागपूरला स्वच्छ आणि सुंदर शहरांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचविण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छेतेची चळवळ निर्माण करूया असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी रविवारी नागपूरकरांना केले.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून महाल येथील मनपाच्या रघुजी राजे भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे स्वच्छ भारत अभियान नागपूरचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरचा सत्कार, गणेशोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण, गणेशोत्सवात सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नागपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त (घनकचरा व्‍यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे, सहाय्यक आयुक्त गणेश राठोड, अनित कोल्हे, स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अँबेसेडर कौस्तभ चॅटर्जी, आरजे राजन, गुरुदास राऊत, कल्पवृक्ष ट्री फाउंडेशनचे सुमेध पडोळे, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, अरविंद रतुडी, उपद्रव शोध पथक प्रमुख विरसेन तांबे, ग्रीन व्हिजिलच्या सुरभी जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशात मोठया प्रमाणात स्वच्छते विषयी उपक्रम आयोजित केल्या जात आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिल्या जात आहे. नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि विकासाच्या मार्गावर अधिक पुढे नेण्यासाठी सर्वानी मिळून कार्य करायला हवे आहे. या संदर्भात मनपाद्वारे विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. या उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशात नागपूर शहराला स्वच्छतेच्या यादीत टॉप टेन मध्ये आणण्यासाठी अधिक लोकसहभागाची गरज आहे. या स्वच्छता दिवशी आपण सर्वानी सोबत येऊन कार्य करण्याचे ठरवूया असे आवाहनही राधाकृष्णन बी. यांनी केले. याशिवाय यंदाचा गणेशोत्सव नागपूरकराणी पर्यावरणपूरक साजरा केला असल्याचेही त्यांनी सांगितले.स्वच्छ भारत अभियान नागपूरचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी, आरजे राजन, गुरुदास राऊत यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय गणेशोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यात प्रथम पारितोषिक शशांक चौरासिया यांना प्रदान करण्यात आले. तर द्वितीय पारितोषक प्रेमा हेडाऊ यांना तर तृतीय पारितोषिक स्वप्नील चौरागडे यांना प्रदान करण्यात आले. तसेच घनशाम केसलकर यांचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला, याशिवाय नागपूर ग्रामीण खापरखेडा पोलीस स्टेशनचेठाणेदार प्रवीण विष्णुपंत मुंडे यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच ग्रीन विजिल फाउंडेशन, कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन, तेजस्विनी महिला मंच, इकोफ्रेंडली लिव्हींग फाउंडेशन, किंग कोबरा आर्गेनायझेशन यूथ फोर्स लोटस कल्चरल अँड स्पोर्टींग असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ नागपूर मुख्य,रोटरी क्लब ऑफ नागपूर मिहान टाऊन, रोटरी क्लब ऑफ नागपूर एशान्या, रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजन आदी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा गणेशोत्सवात सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर स्वच्छ सर्वेक्षण २०२३ करीता नवनियुक्त पाच ब्रँड अ‍ॅम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी,  आरजे राजन, गुरुदास राऊत, किरण मुंदडा आणि उमेश चित्रिव यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकित इमगीरवार, हर्षा रंभाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com