नागपूर :-संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या परिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, नितीन शिंगाडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, महिला नेत्या सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करून अभिवादन केले.
“बाबा आपका मिशन अधूरा बीएसपी करेगी पुरा, बाबासाहेब का सपना अधुरा बीएसपी करेगी पुरा, महापुरुषोके सन्मान मे बीएसपी मैदान मे, बाबासाहेब अमर रहे, जो बहुजन की बात करेगा वह दिल्ली से राज करेगा, संविधान के सन्मान में बीएसपी मैदान, में तख्त बदल दो ताज बदल दो बेईमानो का राज बदल दो, व्होट हमारा राज तुम्हारा नही चलेगा नही चलेगा, जयभीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने मे, बीएसपी की क्या पहचान नीला झेंडा हाथी निशान” आदि स्फूर्तीदायक घोषणा देऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक इब्राहिम टेलर, संजय जयस्वाल, विकास नागभिडे, नरेंद्र वालदे, महेश सहारे, योगेश लांजेवार, राजू चांदेकर, अविनाश नारनवरे, अभिलेष वाहने, राजकुमार बोरकर, डॉक्टर शितल नाईक, चंद्रशेखर कांबळे, मुकेश मेश्राम, प्रवीण पाटील, संजय सोमकुवर, सनी मून, जगदीश गजभिये, विशाल बन्सोड, संजय इखार, प्रकाश फुले, एड अतुल पाटील, सुरेंद्र डोंगरे, मनोज निकाळजे, मनोज गजभिये, सुंदर भलावी, सदानंद जामगडे, उमेश मेश्राम, नरेश वासनिक, श्रीकांत बडगे, विलास मून, चंद्रसेन पाटील, नितीन वंजारी, बबीता डोंगरवार, माधुरी मेश्राम, वर्षा सहारे, दर्शना दहीवसे, सविता वागदे, ताराबाई गौरखेडे, सविता बागडे, साधना रंगारी, सुधाकर सोनपिंपळे, गौतम गेडाम, अनिल साहू, बुद्धम राऊत, अरुण शेवडे, राजेंद्र सुखदेवे, सावलदास गजभिये, शरद शेंडे, सुबोध गणवीर, रोहित वालदे, राजेश नंदेश्वर, वीरेंद्र कापसे, प्रफुल पाटील, अनिल मेश्राम, सुनील शेंडे, अनिल नारनवरे, अमित बागेश्वर, अनिल साहू, विवेक सांगोळे, किरण पाली, शामराव तिरपुडे, राजरत्न कांबळे, संभाजी लोखंडे, अंकित थुल, चंद्रमणी गणवीर, गोपाल मेश्राम, विकास नारायणे, सतीश पानेकर, विश्वनाथ मेश्राम, सुमित जांभुळकर, निहाल गजभिये, जितेंद्र पाटील, आदेश रामटेके, सुनील डोंगरे, सुनील सोनटक्के, विद्यार्थी शेवडे आधी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.