निर्दयतेने व क्रूरपणे कत्तल करण्याकरीता वाहतुक करीत असलेल्या २४ गोवंशीय जनावरांची सुटका, तिन आरोपी ताब्यात, एकुण २३,६०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- पोलीस ठाणे पारडी चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, पाळत ठेवुन, पो. ठाणे हद्दीत नागपूर भंडारा, हायवे रोडवर, हल्दीराम कंपनी जवळ आम रोडवर सार्वजनीक ठिकाणी, एका संशयीत आयसर ट्रक क. एम. पी ९ जी.एच ४८३५ यास धांववुन रेड कारवाई केली असता, त्यामध्ये एकुण २४ जिवंत गोवंशीय जनावरे यांना कोंबुन, त्यांना कुरतेने व निर्दयतेने वागणुक देवुन, अवैधरित्या कत्तल करण्याकरीता वाहतुक करताना मिळुन आले. जनावरांबाबत अधिक विचारणा केली असता, आरोपी क. १) राजु मदन पाल, वय ४० वर्षे, रा. गुलशन नगर, कळमणा, नागपूर २) कमलेश नत्थ्थूलाल गुप्ता, वय ४१ वर्षे, रा. आनंद नगर, यशोधरानगर, नागपूर ३) देवेन्द्र श्यामराव राऊत वय ३५ वर्ष रा. अंबोरा, ता. देवरी जि. गोंदीया यांनी संगणमत करून स्वतः चे आर्थिक फायद्याकरीता नमुद जनावरांची वाहतुक करीत असल्याचे सांगीतले. आरोपींचे ताब्यातुन नमुद २४ गोवंशीय जनावरे व एक आयसर ट्रक, असा एकुण किंमती अंदाजे २३,६०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकुण २४ जिवंत गोवंशीय जनावरे यांची सुटका करण्यात येवुन त्यांना गोरक्षण केन्द्र, नागपूर येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी पोहवा. विशाल भाटीया यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे आरोपींविरूध्द कलम ५(ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९७६, सहकलम ११(१) (घ) (ड) (च) प्राणी करता अधिनियम १९६०, सहकलम १८०, १८१ मो.वा.का, सहकलम ३४ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपी क. १ ते ३ यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि क. ५), यांचे मार्गदर्शनाखाली वयोनि, रजित सिरसाट, पोउपनि, सतिश आहेर, पोहवा, विशाल भाटीया, पोअं. अजय शुक्ला, आशिष मेश्राम यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना १२ तासाचे आत अटक

Fri Apr 12 , 2024
कामठी :-पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत जेपी नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी चंदन पन्नादास डोंगरे वय ३० वर्ष हे त्याचे दुचाकी वाहनाने कामा निमीत्त बाहेर गेले असता पाऊस आल्याने त्याचे खिश्यातील मोबाईल व नगदी ४,०००/- रू हे पाऊसाने ओले झाल्याने ते ड्रॅगन पॅलेस पोलीस चौकी जवळ, आपली गाडी थांबवुन गाडीने डिस्कीत ठेवत असतांगा दोन अज्ञात चोरट्‌यानी अॅक्टीव्हा गाडीवर येवुन फिर्यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com