संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी प्रतिनिधि 10 नोव्हेबर — दिवसेंदिवस महागाई वाढत असून दिव्यांगांचे जगणे असहय होत आहे सध्या शासना द्वारे दिव्यांगाना एक हजार ₹ मासिक अनुदान देण्यात येते या तुटपूंज्या अनुदानात संसाराचा गाड़ा चालविणे अशक्य आहे,त्यामुळे शासनाने दिव्यांगाना मासिक पाच हजार ₹ अनुदान दयावे अश्या मागणीचे निवेदन विधान परिषद सदस्य आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बुधवारी (9 नोव्हेबर ) ला दुपारी देण्यात आले
आत्मनिर्भर दिव्यांग वेलफेयर सोसायटी चे मार्गदर्शक उज्ज्वल रायबोले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदना द्वारे दिव्यांगां चे अनुदान दर महिन्यात 5 तारखे पर्यंत अदा करावे, बैंक-तहसील कार्यालय आणि कोषागार दरम्यान समन्वय ठेवावा, शासकीय कार्यालयात दिव्यांगां साठी रैंप बनवावे आणि दिव्यांगांना शासकीय कार्यालयात सनमानाची वागणुक दयावी या प्रमुख मागण्या केल्या
दिव्यांगांच्या शिष्टमंडळात विजय फुले, अरुण पौनिकर, सुनिल हजारे, परमानंद मेश्राम,सुभाष राऊत,अशोक चव्हान, धिरज वंजारी, गणेश सायरे, सुशिला हजारे,सिमा पानतावणे,वृदां राऊत,शौकत अली,वसिम हैदरी, शेख अशफाक, गजानन दोरसेटवार, प्रफुल ऊके, अरुण मानवटकर यांचा समावेश होता.