संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले त्यातुन त्यांनी प्रखर व सत्यवादी लेखणीतून महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली त्यातूनच त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळख मिळाली असल्याचे मौलिक प्रतिपादन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी शनिवारी 17 सप्टेंबर ला कामठी तहसील कार्यालयात आयोजित ठाकरे जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले.
याप्रसंगी नायब तहसीलदार राजीव बमनोटे, प्रस्तुतकार अमोल पौंड , वसुंधरा मानवटकर, सुधीर चव्हाण ,माधुरी वाघमारे, व्ही पी मेश्राम,तेलपांडे,सुमिता जगताप,ज्योती गोरलेवार,माधुरी उईके, तलाठी वकील,गजेंद्र वंजारी,रुलेश मेश्राम,भुपेंद्र निमकर,कुंजीलाल पानतावणे,शैलेश धमगाये, सुशीला कोकाड़े,कुंभलकर, सचिन जाधव यासह तहसील कार्यालयीन अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.