कामठी :- कामठी आणि नवी कामठी ला जोडण्यासाठी रेल्वे स्टेशन जवळ फुट ओव्हर ब्रिज साठी पुढाकार घ्यावा अश्या मागणीचे निवेदन कामठी रेल्वे स्टेशन चे प्रबंधक एस शिवराम यांना देण्यात आले.
नवी कामठी भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत असून जगप्रसिद्ध ड्रैगन पैलेस टेंपल, पैगोड़ा, डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र, विविध शैक्षणिक महाविद्यालये, वखार गोदाम नवी कामठी परिसरात आहेत.
रेल्वे स्टेशन च्या पुर्व पश्चिम भागात सुरक्षा भिंत नसल्याने स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि चाकरमाने सर्रास पणे रेल्वे लाईन ओलांडून जाणे येणे करतात. त्यात अपघात होण्याची भिति असते, रेल्वे स्टेशन जवळ फुट ओव्हर ब्रिज चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री असतानां कामठी बसस्थानक ते वखार महामंडळ धान्य गोदाम पर्यंत प्रस्तावित करण्यात आला होता, त्याच प्रस्तावा चा पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी भाजप पदाधिकारी लालसिंग यादव, उज्वल रायबोले, प्रतिक पड़ोळे,रमेश वैद्य,संध्या रायबोले यांनी निवेदना तुन केली आहे.