नागपूर :- दक्षिण भारतात पाखंड विरोधी व विज्ञानवादी दृष्टिकोन पसरवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, देवा धर्माच्या नावाने फसविणार्या पासून समाजाला सावधान केले, केरळच्या बायकोम सत्याग्रहात पुढाकार घेतला, दलित शोषितांच्या हितासाठी असलेल्या सायमन कमिशनचे बाबासाहेबांसारखेच समर्थन केले, अशा जस्टीस पार्टीचे संस्थापक असलेल्या तत्कालीन मद्रास (तामिळनाडू) मध्ये ज्यांची महापुरुष म्हणून गणना होते. असे दक्षिण भारतातील पेरियार रामास्वामी नायकर म्हणजेच महाराष्ट्रातील महात्मा फुले होय. त्यांच्या कार्यापासून स्वतः बसपा संस्थापक कांशीराम यांनी प्रेरणा घेतली व दक्षिण भारतात आपल्या चळवळीचा पाया मजबूत केला. अशा महापुरुषांची 143 वी जयंती नागपूर जिल्हा बसपा च्या वतीने नागपूर विभागीय प्रदेश कार्यालयात संपन्न झाली.
याप्रसंगी प्रदेश सचिव नितीन शिंगाडे, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष जगदीश गजभिये, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, उमेश मेश्राम, सुधाकर सोनपिपळे, वीरेंद्र कापसे, राजकुमार तांडेकर, विवेक सांगोळे, रामराव निकाळजे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.