संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 3 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावातील कडू कुटुंवातील एक विवाहीत महिला ही आंघोळीसाठी हिटर वर पाणी गरम करून घरकामात व्यस्त असता अचानक पाणी गरम झाला की नाही हे पाहायला गेले असता दुर्दैवाने विद्दुत धक्का लागल्याने सदर विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे बारा दरम्यान घडली असून मृतक महिलेचे नाव मनीषा राजेश कडू वय 32 वर्षे रा खैरी कामठी असे आहे.
या घटनेने संपूर्ण खैरी गावात शोककळा पसरली आहे तर मृतक महिलेच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतक महिलेच्या पाठिमागे कुटुंबियात एक 7 वर्षीय मुलगी सह बराच मोठा आप्तपरिवार आहे.