अमरदिप बडगे,प्रतिनिधी
देवरी पोलिसांची कारवाई नक्षलवादीना फंड रुपात जात होती रक्कम?
गोंदिया :- कोहमाराहून रायपुर कड़े जाणाऱ्या CG-08-R-9000 या कार मध्ये 1 कोटी 90 लाख 43 हजार रूपयांची रोख रक्कम आढळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिरपुर/बांध गावानजीक उघड़कीस आली असून या प्रकरणी 3 आरोपीनां देवरी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम नक्षलवादीना फंड रुपात जात असल्याची धक्कादायक शक्यता वर्तविन्यात आली आहे देवरी पोलिसांच्या सुजबुजतेने नक्षलवादयाची रसद तुटली आहे? पण पोलिसांनी तिन्ही आरोपीनां हमिपत्रावर सोडल्याने नेमका पोलीसांना काय सद्या करायचं आहे? हे कळेनासे झाले आहे.