संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– आरक्षण सोडतीत ओबीसी आरक्षणानुसार 6 जागा ओबीसी च्या वाट्याला आल्या
कामठी ता प्र 28 :- कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)व सर्वसाधारण (महिला )आरक्षण सोडतिचा सुधारित कार्यक्रम अंतर्गत आज 28 जुलै ला सकाळी 11 वाजता कामठी तहसील कार्यालयात कामठी नगर परिषद चे प्रशासक व एसडीओ श्याम मदनूरकर व मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मुख्य उपस्थितीत ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली .या आरक्षण सोडतीत नुकत्याच 13 जुलै ला काढलेल्या आरक्षण सोडतीत काढण्यात आलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती च्या प्रवर्गाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता बंठिया आयोगाने निर्देशित केलेल्या कामठी नगर परिषद चे ओबीसी आरक्षण हे 19.7 नुसार सहा जागा ओबीसी आरक्षनासाठी निवड करायची होती .त्यानुसार आज काढलेल्या आरक्षण सोडतीत सर्वसाधारण प्रवर्गातील सहा चिठया पारदर्शक बरशी मध्ये घालून शालेय विद्यार्थ्यांचा हाताने ईश्वरचीठीच्या आधारे सहा जागेचे ओबीसी आरक्षण काढण्यात आले.ओबीसी महिला आरक्षण काढण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्रभाग क्र 1,2,6,7,8,11 च्या सर्वसाधारण प्रवर्गातील ईश्वरचीठ्या पारदर्शक बरणीत घालण्यात आल्या त्यातील तीन चिठ्या ओबीसी महिला आरक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांचे हस्ते काढण्यात आले त्यानुसार समावेश होता यातील तीन चिठ्या ओबीसी महिला आरक्षण साठी काढण्यात आल्या त्यानुसार ओबीसी महिलांसाठी प्रभाग क्र 2, प्रभाग क्र 8 व प्रभाग क्र 11 आरक्षित ठरविण्यात आले तर प्रभाग क्र 1, प्रभाग क्र 6 व प्रभाग क्र 7 नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी प्रभाग क्र 1(ब),4(ब),5(ब),6(ब),7(ब),10(ब), 12(ब),13(ब),14(ब) ह्या 9 जागा थेट आरक्षित करण्यात आले.
एकूण 17 प्रभागातील 34 जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना आरक्षण राखीव असल्याने 17 जागेचे आरक्षण काढण्यात आले.त्यानुसार अनुसूचित जाती साठी 10 तर अनुसूचित जमातीसाठी 1 तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 6 जागा आरक्षित करण्यात आल्या. यातील महिला आरक्षणाचा विचार केला असता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10 प्रभाग निश्चित करण्यात आले होते त्यामध्ये प्रभाग क्र 3,4,9,10,12,13,14,15,16,17 चा समावेश होता यातील 5 जागा अनुसूचित जाती महिला साठी आरक्षित करायचे होते त्यानुसार प्रभाग क्र 3,9,15,16,17 ह्या अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 जागा आरक्षित होती त्यानुसार प्रभाग क्र 5 (अ)आरक्षित करण्यात आले. तर आज काढलेल्या आरक्षणात नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 1,2,6,7,8,11 हे प्रभाग आरक्षित होते त्यातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात प्रभाग क्र. 2,8,11 हे आरक्षित करण्यात आले तर प्रभाग क्र. 1,6,7 हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी आरक्षित करण्यात आले.
याप्रसंगी कामठी नगर परिषद चे उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण, कर अधीक्षक आबासाहेब मुंढे, विक्रम चव्हाण,अभियंता मंगेश लाडे,1 प्रदीप भोकरे,रंजित माटे , राहुल भोकारे यासह कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम, दीपनकर गणवीर, उज्वल रायबोले, काशीनाथ प्रधान, संजू कनोजिया, नरेश चौकसे, विनोद वाधवाणी , नागसेन गजभिये आदी उपस्थित होते