सोनिया गांधीला दिलेल्या ईडी नोटीस चा काँग्रेस तर्फे निषेध

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 26 :- काँग्रेस च्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना ईडी ची नोटीस बजावल्याने या नोटीस च्या विरोधात आज सकाळी 11 वाजता गांधी भवन कामठी येथे कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव यांच्या नेतृत्वात समस्त काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मुख्य उपस्थितीत बजावलेल्या ईडी नोटीसचा निषेध दर्शवित नारे प्रदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी कामठी शहर काँग्रेस अध्यक्ष कृष्णा यादव, माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर,माजी नगराध्यक्ष नीरज यादव,आबिद ताजी, मुस्ताक अहमद, अहफाज अहमद,सुलेमान अब्बास,राजकुमार गेडम,मोहम्मद आरिफ,फारूक कुरैशी,अब्दुल सलाम अंसारी,मोहम्मद सुल्तान,सुरैया बानो,आकाश भोकरे,आशिष मेश्राम,शाम लेंगगांवर,एहफूज कुरैशी,मंजू मेश्राम,राजमणि तालेवार, शमसुन निशा,पप्पू चिमंनकर,अंबिका रामटेके,अनिता खोब्रागडे, जेटली यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यु

Wed Jul 27 , 2022
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र  :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावाजवळ गादा मार्गे सावनेर ला दुचाकी ने जात असलेल्या कंत्राटी शिक्षकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जख्मि होऊन उपचारादरम्यान आज दुपारी दीड दरम्यान मृत्यु पावल्याची दुर्दैवी घटना घडली असून मृतक शिक्षकाचे नाव राजू देशपांडे वय 50 वर्षे रा तीर्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!