मी सदैव शाहिरांच्या पाठीशी आहे – माजी आमदार रडके

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

शाहिरकलाकार यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी,अन्यथा शाहिरांचा भव्य मोर्चा विधांभवनावर काढणार — शाहिर बावनकुळे
भव्य शाहिर कलाकार मेळावा संपन्न

कामठी ता प्र : राज्यात शाहीर कलाकार कलाकारांची संख्या बरीच मोठी आहे परंतु शासनाने यांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते यामुळे हे शाहीर मंडळी शासकीय लाभापासून वंचित राहतात तेव्हा या शाहीरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहे अशी गवाई माजी आमदार देवराव रडके यांनी दिली ,भारतीय कलंगि शाहिर डहाकl मंडळ आणि भारतीय कलाकार शाहिर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय संताजी नाऱ्याचे जनक लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री राम जानकी मंगल कार्यालय कामठी येथे आयोजित गुरुपूजा आणि शाहीर मेळाव्यात ते बोलत होते . शाहिरांना संपूर्ण शासकीय योजनांचा लाभ मिळावे , सांस्कृतिक हॉल सरकारने बांधून द्यावे ,नवीन युवा शाहिरांनी आपला सांस्कृतिक वारसा सुरू ठेवावा, तसेच शाहीर कलाकार यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अन्यथा शाहीरांच्या भव्य मोर्चा विधानभवनांवर काढणार असे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले याप्रसंगी राधेश्याम हटवार यांनी सांगितले की शाहीर मेळाव्याचे आयोजन नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे आयोजन आहे सर्व शाहीर कलाकारांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या रेटून धरावे यासाठी मी नेहमी मदत करायला तयार आहे ,माजी मानधन समिती अध्यक्ष आनंदराव ठवरे यांनी सांगितले की मी आणि शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी स्वतः मुंबई मंत्रालयात जाऊन माजी संस्कृती मंत्री विनोद तावडे आणि माजी ऊर्जामंत्री पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून 60 अर्ज पात्र होत होते ते 100 अर्ज करून घेतले तसेच मानधनात वाढ करून घेतले आणि शाहीरांच्या ज्या समस्या आहे त्यासाठी मी नेहमी मदतीसाठी तत्पर आहे असे आनंदराव ठवरे यांनी सांगितले , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद अlमधारे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की स्वर्गीय भिमराव बावनकुळे गुरुजी यांनी 7 मोर्चे विधानसभेवर काढले तेव्हा मी स्वतः हजर राहून त्यांना मदत केली आणि राजेंद्र बावनकुळे आणि त्यांचे सहकारी शाहीर मंडळ यांच्या साठी मी नेहमी मदतीसाठी तयार आहे शाहिरी कला हे जुनी कला आहे ती लोपपाऊं नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मेळाव्यातील हजारो शाहिरांच्या समक्ष बोलून दाखविले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद विदर्भ अध्यक्ष बहादूला बराडे यांनी या भव्य शाहीर कलाकार मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हटले की शाहीर म्हणजे शहानिशा करणारा आहे ही म्हणजे हिम्मत करणारा आणि र म्हणजे मनोरंजन करणारा अशा शाहीर समाज प्रबोधन ,जनजागृती, हुंडाबळी अशा प्रकारची गीत गाऊन जनजागृती आणि नागरिकांचे मनोरंजन करते शाहिरांच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे असे यावेळी आव्हान केले याप्रसंगी ज्ञानेश्वर वांढरे, शाहीर मोरेश्वर मेश्राम,सुबोध कान्हेकर, यांनी मार्गदर्शन केले उपस्थित शाहिरांनी खडीगंमत, दंडार गोंधळ ,पोवाडे,डहाके , भजन गीत सादर केले,स्व भीमराव बावनकुळे यांच्या जीवनावर शाहिर ब्रह्म नवघरे, सुभाष वंगर,अरुण मेश्राम, भगवान लांजेवार,चिरकूट पुनडेकर, कुणाल झळके, प्रकाश राऊत,विनायक नागमोते आदींनी गीत सादर करून उपस्थितांचे मंत्र मूग्ध केले दरम्यान माजी आमदार देवराव रडके ,हुकूमचंद आमधरे, राधेश्याम हटवार, अंबादास नागदेवे, राजेंद्र बावनकुळे, ज्ञानेश्वर वांढरे,यांच्या हस्ते शाहीर कलाकार ,पत्रकार आणि विद्यार्थी यांचे स्मृतिचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शाहिर गरीबा काळे, शाहीर अंबादास नागदेवे ,शाहीर सुबोध काणेकर, शाहीर प्रभाकर सूर्यवंशी, शाहीर शंकर येवले शाहीर उर्मिला ताई ,ललकार चव्हाण, शाहीर दयाळ कांबळे,भाजप शहराध्यक्ष संजय कनोजिया यांची प्रमुख उपस्थिती होती,कार्यक्रमाचे संचालन सुरज नवघरे आणि आभार राजेंद्र बावनकुळे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहिर अरुण मेश्राम, भगवान लांजेवार, विक्रम वांढरे, मोरेश्वर बडवाईक, गजानन वडे, रविंद्र मेश्राम, भुपेश बावनकुळे, वीरेंद्र शेंगर, गिरीधर बावणे, युवराज अडकने,मनोहर वाघमारे,दशरथ भडंग, संभाजी लक्षणे,फागो इरपती, महादेव पारसे, प्रफुल भणारे,रमेश रामटेके, प्रदीप कडबे, शंकर मौतकार, राजेंद्र बावणे, दिलीप मेश्राम, हरिनाथ लेंडे, हरी कुंभलकर, तबला वादक छगन बावनकुळे,रमेश गणोरकर, नथु चरडे,यशोदा सोमनाथे, सुनंदा जगनाडे,वंदना घुमडे, अरुणा बावनकुळे ,ईश्वर करडभाजने, स्वामी करडभाजनेआणि सभासद यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तिरोडा तालुका राष्ट्रीय ओबीसी अध्यक्षपदी डॉ.चव्हाण यांची नियुक्ती

Mon Jul 18 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुका ओबीसी अध्यक्षपदावर डॉ गोवर्धन चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल वाय.टी.कटरे, मेघा बिसेन, भुमेश्वर पारधी,यांना श्रेय दिले आहे.राजू चामट , विनोद कुकडे, महेश कुकडे, बालु बोपचे, व शेंडे यांनी डॉ. गोवर्धन चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!