संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर कन्हान येथे घरी कुणीही नसल्याची संधी साधुन अज्ञात चोराने घराचे मागील दाराची कुंडी तोडुन बेडरूम मधिल लोखंडी आलमारीचे लॉकर तोडुन त्यातील नगदी ३५ हजार रूपये चोरून नेल्याने पोस्टे कन्हान ला तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेन्द्र मुरलीधर ज्ञानेश्वर वय – ३६ वर्ष राह. प्रभाग क्र.२ हनुमान नगर कन्हान हे ज्ञानेश्वर मारोत राव विघे हयाचे घरी भाड्याने दोन वर्षा पासुन पत्नी रूपाली व २ मुले व आई सोबत राहत असुन आचारी चे काम करतो. त्यांच्या मामाची प्रकृती बरी नसल्याने आई (दि.११) जुलै ला दिघोरी नागपुर येथे गेली होती. व पत्नी रूपाली दोन्ही मुलांना घेवुन माहुली पारशिव नी येथे नामकरणासाठी (दि.११) जुलै ला गेली होती. आणि राजेंद्र घरी एकटेच असल्याने (दि.१३) जुलै ला सायंकाळी ७.३० वाजता घराला मागील दाराची कुंडी लावुन समोरील दाराला कुलुप लावुन बहीण सिंधुबाई पु-हे राह. संताजीनगर कांद्री येथे गेले होत व रात्री संताजीनगर येथे बहिणीचे घरी जेवण करून झोपलो व सकाळी संताजीनगर येथे असतांना साळा भुषण डोंगरे यांचा फोन आला की रुपाली ताई सोबत आलो आहे. असे सांगीतल्याने धर्मराज शाळेजवळ येवुन पत्नीसह घरी गेलो व दाराचे कुलुप उघडुन आत गेलो. तेव्हा बेडरूम ची लोखंडी आलमारीचे लॉक तोडुन आलमारीतील सामन व कपडे खाली पडलेले दिसले आणि मागील दाराची कुंडी तुटलेली दिसली. तेव्हा आलमारीत ठेवलेले ३५००० रुपये पाहीले असता ते दिसले नाही. तेव्हा समजले की (दि.१३) चे सायंकाळी ७.३० ते (दि.१४) चे सकाळी १०.३० वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरांनी घराचे मागील दाराची कुंडी तोडुन घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडुन ३५००० रुपये चोरून नेल्या ने राजेन्द्र मुरलीधर ज्ञानेश्वर यांनी पोस्टे कन्हान ला तक्रार दिल्याने पोलीसानी अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोस्टे चे पो हवा. खुशाल रामटेके पुढील तपास करित आहे.