कामठी नगर परिषदेचे 82 हजार 685 मतदार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी ता प्र 7 :- कामठी नगर परिषद च्या वतीने अंतिम मतदार यादी 5 जुलै ला प्रसिद्ध करण्यात आली असून यात कामठी शहरातील एकूण 82 हजार 685 मतदारांचा समावेश आहे.
राज्याच्या राजकीय नाट्य घडामोडीनंतर स्वराज्य संस्थांची निवडणूकीची घोषणा ही केव्हाही होऊ शकते त्या अनुषंगाने कामठी नगर परिषद च्या निवडणूक विभागाने आपले कामे जोमात सुरू केले असून प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार प्रभाग क्र 1 मध्ये 3844 मतदार,प्रभाग क्र 2 मध्ये 5829, प्रभाग क्र 3 मध्ये 4247, प्रभाग क्र 4 मध्ये 4255, प्रभाग क्र 5 मध्ये 4398, प्रभाग क्र 6 मध्ये 4936, प्रभाग क्र 7 मध्ये 5949, प्रभाग क्र 8 मध्ये 4857, प्रभाग क्र 9 मध्ये 5105, प्रभाग क्र 10 मध्ये 5204, प्रभाग क्र 11 मध्ये 4984, प्रभाग क्र 12 मध्ये 5342, प्रभाग क्र 13 मध्ये 4502, प्रभाग क्र 14 मध्ये 5070, प्रभाग क्र 15 मध्ये 4474, प्रभाग क्र 16 मध्ये 5097, तर प्रभाग क्र 17 मध्ये 4592 मतदारांचा समावेश आहे.तर लवकरच 9 जुलै ला बुथनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने त्यानंतर निवडणुकीची आचार संहिता लागू होणार तर नाही ना ..अशीही चर्चा रंगत आहे
दरम्यान नगर परिषदेकडुन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच भावी नगरसेवक अधिक जोमाने कामाला लागले असून आपल्या प्रभागातील मतदार यादीतील आपले मतदार कोणकोण आहेत याची ओळख करून घेण्यास व मतदार यादी पाठ करून घेण्यासाठी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. तर मतदारही आपले मतदान कोणत्या प्रभागात आहे याची खात्री करून घेत आहेत.राज्यात सत्ता हस्तांतरणानंतर भावी नगरसेवक कोणता झेंडा हातात घेऊ या संभ्रमात पडलेला दिसून येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बसपा कामठी शहराध्यक्षपदी अनिल कुरील यांची नियुक्ती

Thu Jul 7 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 7 :- आगामी निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर बहुजन समाज पार्टीने पक्षबांधणी मजबुतीवर जोर दिला असून पक्ष संघटन बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने बहुजन समाज पार्टी चे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी नुकतेच कामठी शहर तसेच कामठी विधानसभा कार्यकारीणी जाहीर केली.जाहीर कार्यकारीनीनुसार कामठी शहराध्यक्षपदी बसपा चे तरुण तडफदार , निष्ठावंत कार्यकर्ता अनिल कुरील यांची नियुक्ती करण्यात आली तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!