संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष मो आबीद ताजी यांची कांग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्ती बद्दल नवनियुक्त आबीद ताजी यांनी माजी मंत्री सुनील केदार,कांग्रेस चे नागपूर जिल्हा ग्रा अध्यक्ष राजेंद्र मुळक,कांग्रेस अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट् प्रदेश अध्यक्ष व आमदार डॉ वजाहत मिर्जा, यांचे आभार मानत पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असून पक्षाच्या कार्याप्रती कटिबद्ध राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
तर या नियुक्तीबद्दल मो आबीद ताजी मित्र परिवारच्या वतीने मो आबीद ताजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.