नागपूर :- आज रामदासपेठ येथील तुली इम्पीरियलच्या मागे भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगराच्या वतीने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चानी आंदोलन केले.
मुंबईवरील हल्ल्यात शहीद होणारे पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांना गोळी लागली नाही. वड्डेट्टीवार यांनी म्हटलं की गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पिस्तुलातून लागली होती. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष बादल राऊत यांच्या नेतृत्वात समस्त भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरच्या वतीने तीव्र आंदोलन करून वडेट्टीवर यांचा निषेध केला असून त्यांचा पुतळा फुंकण्यात आला. वडेट्टीवार यांनी माफी मागायला हवी असा आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर महामंत्री यांनी केले आहे. अन्यथा यापेक्षा ही तीव्र आंदोलनचा इशारा भाजयुमोने दिला.
आजचे आंदोलन भाजपा शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो शहर अध्यक्ष बदल राऊत यांच्या नेतृत्वात तसेच भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवाणी दाणी सचिव रितेश राहाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले असून महामंत्री अमेय विश्वरुप, आशिष मोहिते, सौरभ पाराशर, सागर घाटोळे, पुष्कर पोरशेट्टीवार, कुलदीप माटे, नागेश साठवणे, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, मंगेश गोमासे, वेदांत जोशी, राकेश भोयर, संदीपान शुक्ला, हरीश निमजे, आकाश ढवळे, निखिल गौरकर, महेश दांडेकर, अंकिता समदले, अनुपम भगत, सायली उपासे, पवन महाकाळकर, भूषण शेंडे, शौनक जहांगीरदार, आशुतोष भगत, यश भगत, अमन पौनिकर, यश चौधरी, तेजस जोशी, आकाश धावळे, राजा मिश्रा, तनय चौबे, अनिकेत पंडित, श्रीवर्धन कोलारकर, सागर हिवारकर, डॉ. समीर कुडपुले, निखिल गाउळकर, सुरज येरमे, उदय मिश्रा, अक्षय शर्मा, वरुण गजभिए, संदीपन शुक्ला, धीरेंद्र गायकवाड, अजय मेश्राम, महेश शाहू, पिंकेश पटले, जयेश बिहारे, हर्षल वाडेकर उपस्थित होते.